थोडक्यात
बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार
नियमित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही 1500 जागा रिक्त
बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी आत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीएस्सी नर्सिंगच्या रिक्त राहिलेल्या संस्थात्मक जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर केली आहे.
राज्यामधील संस्थात्मक कोट्यातील सुमारे 1500 जागा रिक्त राहिल्या असून ही संख्या लक्षात घेता भारतीय परिचर्या परिषदेने परिचारिका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीएस्सी नर्सिंगच्या रिक्त राहिलेल्या संस्थात्मक जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली असून ही फेरी 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.