महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबई मेट्रो प्रशासनाने निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने आपल्या फेऱ्यांच्या वेळात बदल केला आहे. पालिका आणि इतर निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोच्या फेऱ्या पहाटे लवकर सुरु होऊन मध्यरात्री उशीरापर्यंत चालू राहणार आहेत. यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी आणि आपले कार्य पूर्ण करण्यासाठी सोयीस्कर प्रवास उपलब्ध होईल.
20 नोव्हेंबर रोजी वर्सोवा ते घाटकोपर मुंबई वन मेट्रोची पहिली फेरी पहाटे 4 वाजता सुटेल. आणि शेवटची फेरी दोन्ही स्थानकावरुन ( 21 नोव्हेंबर रोजी ) मध्यरात्री 1 वाजता सुटणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर इलेक्शन ड्यूटीसाठी वेळेत पोहचण्यासाठी ड्युटीसाठी मेट्रो वनच्या फेऱ्या सकाळी लवकर आणि रात्री उशीरा सोडण्यात येणार आहेत.