Goverment is ready to talk with ST Employees on strike 
ताज्या बातम्या

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा

एस टी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला आता 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक महाव्यवस्थापकांनी सातारा विभागाला दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

एस टी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला आता 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक महाव्यवस्थापकांनी सातारा विभागाला दिले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने 'स्मार्ट कार्ड' योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या असलेली ओळखपत्रे 31 नोव्हेंबर पासून महामंडळाच्या कोणत्याही प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विविध पुरस्काराथींना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. 31 ऑक्टोबर पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरता सध्याची असलेली ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व आगारांच्या आगार प्रमुखांना विभागीय कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकार विविध प्रकारच्या सवलती देण्याचा एकोणतीस योजना राबवत आहे. तर विविध सामाजिक घटकांना सुमारे 25 ते 100% पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलती दिल्या जाते. महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 25 टक्क्यांपासून 100 टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली 'स्मार्ट कार्ड' काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय