माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपा विरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपा मधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी भाजपचे पराभूत आमदार राम सातपुते यांनी केली आहे. रणजितसिंह यांनी भाजप विरुद्ध काम केल्याचा आरोप सातपुते यांनी लगावला आहे.