Mumbai Big disclosure | raped in Mumbai  team lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक मुंबईत दररोज तीन महिलांवर बलात्कार, पोलिसांच्या अहवालात मोठा खुलासा

जून आणि मे महिन्यात म्हणजे गेल्या 61 दिवसांत 168 महिलांवर बलात्कार

Published by : Shubham Tate

Mumbai Big disclosure : मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या मासिक क्राईम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. या अहवालानुसार दररोज सरासरी 3 महिलांवर बलात्कार होत आहेत. यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत महिलांवरील बलात्काराचे 494 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 417 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. (Every day three women are raped in Mumbai Big disclosure in police report)

अहवालानुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात महिलांवर बलात्काराच्या ७३ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये किरकोळ प्रकरण 36 आणि प्रमुख प्रकरण 37 यांचा समावेश आहे. मे महिन्यात हा आकडा 95 होता, ज्यामध्ये किरकोळ प्रकरणे 52 आणि मोठी प्रकरणे 43 आहेत. जूनमध्ये दररोज 2 महिलांवर बलात्कार झाले, तर मे महिन्यात दररोज 3 महिलांवर बलात्कार झाले. जून आणि मे महिन्यात म्हणजे गेल्या 61 दिवसांत 168 महिलांवर बलात्कार झाला. अशाप्रकारे या काळात मुंबईत सरासरी 3 महिलांवर बलात्कार झाले.

या वर्षी जानेवारी ते जूनपर्यंत म्हणजेच गेल्या 183 दिवसांत महिलांवरील बलात्काराचे 494 गुन्हे दाखल झाले आहेत. दररोज सरासरी 2 ते 3 महिलांनी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. 2021 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत बलात्काराचे 475 गुन्हे दाखल झाले. जानेवारी ते जून या कालावधीत नोंदवलेल्या महिलांवरील बलात्काराच्या 84 टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. हे 2021 च्या तुलनेत 19 टक्क्यांनी जास्त आहे, कारण गेल्या वर्षी पोलिसांनी केवळ 78 टक्के प्रकरणे सोडवली होती.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का