शिवसेनेच्या व्हिपवरुन राडा होण्याची शक्यता आहे. व्हिपवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हिप जारी करण्यात आला आहे.
व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील प्रभू म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचा पालन केले नाही तर तो न्यायालयाचा अपमान होईल.आम्हाला व्हिप बजावला तरी पाळणार नाही. असे प्रभू म्हणाले.