मंगेश जोशी | जळगाव: जळगावातील पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील स्मशानभुमीमधून वृद्ध महिलेचं पार्थिव हे बाहेर काढण्यात आलं. मृत वृद्ध महिला ही मागासवर्गीय समाजातील असल्याने महिलेच्या पार्थिवावर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला.
दुसऱ्या समाजाच्या काही लोकांनी सदर 'स्मशानभूमी आमच्या समाजाची' असल्याचं म्हणत वृद्ध महिलेच्या पार्थिवासह नातविकांना स्मशानाबाहेर काढलं. यामुळे, या वृद्ध महिलेच्या पार्थिवावर स्मशानभुमीबाहेर अंत्यसंस्कार करावे लागले.
पोलिसांत गुन्हा दाखल:
मृत वृद्ध महिलेच्या नातेवाईकांच्या व आप्तेष्टांच्या आरोपावरून पाचोरा पोलिसात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा एकूण 11 जणांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.