भारत सरकार आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी करत आहे. त्याच्या टेस्टिंगसाठी अनेक यूजर्सच्या फोनवर मेसेज आला आहे. लोकांना इमर्जन्सी अलर्टच्या नावाने मेसेज आला आहे. मेसेज आला त्यावेळी फोनमध्ये खूप मोठा आवाज आला होता, जो इमर्जन्सी अलर्ट: गंभीर फ्लॅशसह आला होता. तो आपत्कालीन सूचना प्रणालीचा एक भाग आहे. हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तयार केले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी सरकारने Jio आणि BSNL वापरकर्त्यांना दुपारी 1.30 वाजता सिस्टमची चाचणी घेण्यासाठी संदेश पाठवला होता. हा संदेश सी-डॉटच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. यानंतर लगेचच आणखी एक मेसेज पाठवण्यात आला ज्यामध्ये लोकांना सांगण्यात आले की हा फक्त टेस्ट मेसेज आहे. C-DOT नुसार वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारची चाचणी केली जाईल.
इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम आणि सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीमची क्षमता आणि परिणामकारकता तपासणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजही सरकारने Airtel वापरकर्त्यांना इमर्जन्सी अलर्टचे मेसेज पाठवत आहे.