ताज्या बातम्या

Elvish Yadav: बिग बॉस फेम एल्विश यादवला अटक; १४ दिवसांसाठी पोलीस कोठडी

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी दोनचा विजेता एल्विश यादवबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सापाचं विष तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांनी यादवला अटक केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी दोनचा विजेता एल्विश यादवबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सापाचं विष तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांनी यादवला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशची सेक्टर 113 मध्ये पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच पाच जणांना अटक केली होती. अटक केल्यानंतर एल्विश यादवला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी एल्विश यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयानं सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 20 एमएल सापाचे विष आणि 9 विषारी साप जप्त केले आहेत.

याप्रकरणी डीसीपी नोएडा विद्या सागर मिश्रा यांनी सांगितलं की, ''नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादवला अटक केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादवसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आधी तक्रार दाखल केली होती." पोलिसांनी यापूर्वी एल्विश यादवची चौकशी केली होती.

दरम्यान, या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं एल्विशनं स्पष्ट केलं आहे. मात्र, एका ऑडिओ क्लिपमध्ये एल्विशचं नाव समोर आलं होतं. ऑडिओमध्ये, अटक आरोपी राहुल यादवसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीनं मेनका गांधींची संघटना पीपल्स फॉर ॲनिमल्सला याप्रकरणाबद्दलची माहिती दिली. यानंतर एल्विशला दोषी समजण्यात आलं. पूर्णपणे पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं एल्विशनं एका विधानामध्ये सांगितलं होतं.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय