ताज्या बातम्या

Election Result 2022: हिमाचलमध्ये काँग्रेसच्या विजयावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला.

Published by : shweta walge

हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने जिंकले आहेत. तर हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेस बहुमताने जिंकले आहेत. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले, "या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमची मेहनत आणि समर्पण या विजयासाठी शुभेच्छांना पात्र आहे. मी पुन्हा आश्वासन देतो की, जनतेला दिलेले प्रत्येक वचन लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.

राहुल गांधी यांनी गुजरातमधील पराभवावर ट्विट केले की, आम्ही गुजरातच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्गठन करू, कठोर परिश्रम करू आणि लढत राहू.

हिमाचल प्रदेशात पाच वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार करत 68 जागांपैकी 40 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 25 जागा तर, 3 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...