ताज्या बातम्या

गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; दोन टप्प्यात होणार मतदान

भारतीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 182 जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 182 जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला जाहिर होणार आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा १ डिसेंबरला तर दुसरा टप्प्यात ५ डिसेंबरला पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. याचा निकाल ८ डिसेंबरला जाहिर होणार आहेत. निवडणुकीदरम्यान कोरोना रुग्णाला घरातून मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच, कोणत्याही मतदाराला तक्रार करायची असल्यास थेट निवडणूक आयोगाकडे मोबाईल फोनद्वारे तक्रार करू शकतो. तक्रारीच्या 60 मिनिटांत एक टीम तयार करून 100 मिनिटांत तक्रारीचे निराकरण केले जाईल.

गुजरातमध्ये सध्या एकूण 4.90 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 3.24 लाख नवीन मतदार आहेत. मतदानासाठी एकूण 51,782 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, 182 मॉडेल मतदान केंद्रे असतील. 50 टक्के मतदान केंद्रांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. 33 मतदान केंद्रांवर युवा मतदान पथके असतील. दरम्यान, गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी १८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. गुजरातमध्ये एकूण 182 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा 92 आहे.

तत्पुर्वी, गुजरातच्या 14 व्या विधानसभेच्या 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) 99 जागा जिंकल्या आणि 1995 पासून सत्तेत असलेल्या पक्षाला नवीन सरकार बनवण्यास कोणतीही अडचण आली नाही. त्यावेळी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेही राज्यात ७७ जागा जिंकल्या होत्या आणि सहा जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या.आजच्या घडीला गुजरात विधानसभेत भाजपचे १११ सदस्य आहेत, तर काँग्रेसच्या सदस्यांची संख्या ६२ झाली आहे. दोन जागा बीटीपी आमदारांच्या ताब्यात आहेत, आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि एक जागा अपक्ष आमदाराच्या ताब्यात आहे. राज्यात विधानसभेच्या पाच जागा रिक्त आहेत.

दरम्यान, गुजरातपूर्वी हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 2017 मध्येही दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना निवडणुका जाहीर झाल्या होत्या, मात्र मतमोजणी एकाच वेळी 18 डिसेंबरला झाली. यावेळीही ८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड