ताज्या बातम्या

'लाडक्या बहीण योजनेला कुणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम' एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा!

Published by : shweta walge

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेला कुणी टच केलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असं म्हणत विरोधकांवर थेट हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही आलो की सर्व योजना बंद करणार. जेलमध्ये टाकणार. पोलखोल करणार, असं विरोधक म्हणत आहेत. पण कोणाला जेलमध्ये टाकणार? योजना बंद करणार? तुमची पोलखोल झाली आहे. कोविडमध्येच तुमची पोलखोल झाली. काहीजण तर जेलमध्येही गेले. या सर्व योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, विरोधक आता खुलेआम बोलायला लागले आहेत. एवढी इर्ष्या? लोक विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला टच करायला गेलात तर त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. एकदम करेक्ट कार्यक्रम होणार. आमच्या लाडक्या बहिणी अजिबात ऐकून घेणार नाहीत. आम्ही ठरवलं आहे की लखपती बहिणी बनवणार. माझ्या बहिणींचं काय आहे ते बघा, माझं काय माझं काय बघून उद्योजक पळून गेले. म्हणून ठरवलं आहे सर्वसामान्य माणसाला काय देणार. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस येणार. म्हणून आम्ही काम करतोय”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Prashant Damle: 'कोण होणार हिटलर?' या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले "क्युट" उत्तर!

Vidhansabha Elections| आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज

Kojagiri Purnima 2024 Special Kheer: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्या घरी बनवा तांदळाची स्वादिष्ट खीर

Kojagiri Purnima 2024 Masala Doodh: अवघ्या काही मिनिटांत करा कोजागिरी स्पेशल मसाला दूध; पाहा "ही" रेसिपी

Lawrence Bishnoi: सध्या चर्चेत असलेला लॉरेन्स बिश्नोई आहे तरी कोण? कसा झाला तो गॅंगस्टर; जाणून घ्या...