सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला घडली. या घटनेमुळे संपुर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका टीपणी केली जात आहे. यातच आज या घटनेचा निषेधात महाविकास आघाडीकडून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येतं आहे. तुरुंगात टाकलं तरीही चालेल पण आंदोलन होणारच असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. यावरुनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे.
ते म्हणाले की, महाराजांच्या पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. याबाबत पंतप्रधान आणि आम्ही तिघांनी माफी मागितली. झालेली घटना दुर्दैवी आहेच. पण, त्याच राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे.
कर्नाटक काँग्रेस सरकरकारच्या काळात मागील वर्षी जे दुर्घटना झाली. छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा काढण्यासाठी दोन दोन जेसीबीचा वापर केला. खरंतर जोडे मारले पाहिजे. जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता नक्की जोडी मारेल अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याविरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, असं खैरे यांनी म्हटलं आहे, तर त्यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देत 'लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक दंगलीची भाषा करत होते. महाराष्ट्र अशांत पाहिजे. जाती जातीत ते निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेपूर्वी केला आहे. देशातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महायुती सरकार काम करत आहे' असं म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र जिल्ह्यातील त्यांना गेट आउट केल्यामुळे त्यांची जागा दाखवलेली आहे. काम अफजलखान यावरून आरोग्य बी करायचं हे त्यांनी आतापर्यंत केलं. निवडणुका लढवण्यासाठी शिवाजी महाराजांचे नान घ्यायचं आणि निवडून आल्यावर अफजलखानी कारभार करायच.
महाविकास आघाडीच्या काळात खरंच महिला सुरक्षित होत्या का नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणावत यांचं घर तोडलं. म्हणून शिवाजी महाराजांचे नाव घेण्याऱ्याचा नाव घेण्याचा अधिकार नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे.