ताज्या बातम्या

Eknath Shinde Vote : '2019ची ती घटना जनता विसरलेली नाही' मतदानानंतर मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी 2019 ची घटना लोक विसरलेली नाही असे सांगून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. महायुती सरकार पुन्हा बहुमताने येईल असा विश्वास व्यक्त केला.

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब ठाण्याच्या कोपरी-पाचापाखाडी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.

  2. त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, मतदान पवित्र कर्तव्य आणि जबाबदारी आहे, अशी भावना व्यक्त केली.

  3. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबासह ठाण्याच्या कोपरी-पाचापाखाडी विधानसभा मतदारसंघात मतदान केले. त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, मतदान हे पवित्र कर्तव्य आणि जबाबदारी आहे, ते प्रत्येक नागरिकाने पार पाडले पाहिजे. या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे मुख्यमंत्री शिंदे मतदानानंतर म्हणाले.

ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षातला कारभार या जनतेने पाहिलाय. 2019 ला मतदान झालं. त्यावेळेस चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं. जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं. 2019 ची ती घटना जनता विसरलेली नाही. गेल्या पाच वर्षात या राज्याची दशा कोणी केली? आणि राज्याला विकासाची दिशा कोणी दिली? हे लोकांना माहित आहे”

“या राज्यात विकास योजना सुरु केल्या, कल्याणकारी योजना ज्या आहेत, विकास लोकांना माहित आहे. लाडकी बहिण योजना आहे. या अनेक योजना सर्वसामान्यांसाठी आहेत, लाडकी बहिण, लाडका भाऊ, शेतकरी कामगारांसाठी, ज्येष्ठांसाठी आम्ही योजना आणल्या. त्याचं नक्कीच आम्हाला समाधान आहे” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गेल्या पाच वर्षात राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाकडे नेण्यासाठी, राज्याचा सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या जीवनात बदत घडवण्यासाठी, महाराष्ट्राला शक्तीशाली बनण्यासाठी महायुतीने प्रयत्न केलाय. या राज्याकतील जनता समाधानी आहे. मी स्वत: समाधानी आहे. अडीच वर्षांचा आमचा कार्यकाळ लोकांनी पाहिलाय. महाराष्ट्रातील जनता भरभरुन विकासाला मतदान करतील. मतदानाचा वाढणारा टक्का लोकशाहीला मजबूत करणार आहे. म्हणून सगळ्यांनी मतदान करावं, अशी विनंती करतो” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘राज्यात पुन्हा महायुतीच सरकार बहुमताने येईल’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Vidhansabha Election| Amravati |अमरावतीमधील 8 जागांवर कोणाचा झेंडा,स्थानिक पत्रकारांचं विश्लेषण काय?

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 728 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

Ambernath: अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना! आईनेच नवजात बाळाला इमारतीतून फेकलं

परळी मतदार संघात 122 मतदान केंद्रांवर फेर मतदान होणार?

Reshma Shinde Kelvan: तिच्या माणसांनी केलं तिच केळवण, रेश्माचं थाटामाटत उरकल केळवण