शिंदे सरकारकडून पुणे, मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांप्रमाणे उद्योगांनाही दिलासा मिळणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून पुणे शहरातील घरे महाग होण्याची शक्यता होती.पुणे शहरात 8 ते 15 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 10 ते 15 टक्के तर ग्रामीण भागात 5 ते 7 टक्के दर वाढ प्रस्ताव होता. परंतु शासनाने हा प्रस्ताव मान्य केला नाही.
पुण्यात रेडी रेकनरचे 2022-23 या आर्थिक वर्षात 9.2 टक्के दर वाढ झाली.15 टक्के दरवाढ प्रस्तावीत झाली आहे. रे स्वस्त झाल्यास घरबांधणीसाठी लागणारे साहित्याची मागणी वाढेल. यामुळे उद्योग, व्यवसायही वाढणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासन वाळू डेपो तयार करून ६५० ते ७०० रुपये ब्रास एवढ्या अल्पदराने वाळूची विक्री करणार आहे. या निर्णयामुळे सामान्यांना घरे बांधण्यसाठी स्वस्तात वाळू मिळेल. तसेच वाळू स्वस्त झाल्यामुळे बिल्डरांकडून मिळणाऱ्या घरांच्या किंमतीह कमी होतील.
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वाढीव दराचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. परंतु हा प्रस्ताव शासनाने फेटाळल्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे उद्योगांना दिलासा मिळाला.