ताज्या बातम्या

'ऑनलाइनवरुन त्यांना लाईनवर आणले' मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

परभणीमध्ये 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते.

Published by : shweta walge

परभणीमध्ये 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायम घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईनवर पाहणाऱ्यांना आम्ही लाईनवर आणण्याचे काम केले. त्यांना असा झटका आमच्या माध्यमातून मिळाला की ते थेट लाइनरवरच आल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन बसून करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. "तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

सरकार पडणार, मुख्यमंत्री बदणार अशा खोट्या बातम्या सतत पसरवल्या जातात. पण या बातम्या पसरवता पसरवता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झालं. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण केल्याचं काम केलं जात आहे. पण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय