ताज्या बातम्या

'...गिरीश भाऊ तुम्हाला जोडे मारायला मी केव्हा येऊ?' एकनाथ खडसे

श्री खडसे यांना गौण खनिज प्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून एअर अॅम्बुलन्सने मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. असा कोणता ह्यदयविकाराचा झटका त्यांना आला ? खोटी सोंगं करायची.

Published by : shweta walge

गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील वाद संपता संपत नसून एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या चॅलेंज प्रमाणे गिरीश भाऊ जोडे मारायला केव्हा येऊ? असा प्रश्न एकनाथ खडसेंनी आपला मेडिकल रिपोर्ट सादर करून गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला आहे.

गिरीश महाजन यांनी आपली बदनामी केल्याप्रकरणी त्यांना एक रुपयाची अब्रू नुकसानीची नोटीस बजावली असून गिरीश महाजन यांनी अब्रू नुकसानीच्या पोटी एक रुपया द्यावा किंवा आपण केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी ही एकनाथ खडसेनी केली आहे. तसेच तुम्ही जोडे मारण्याचा कार्यक्रम माझ्या फोटोला केला पण मला प्रत्यक्ष तुम्हाला जोडे मारायचे आहेत असे म्हणत ज्यांनी माझ्या फोटोला जोडी मारली ते सर्व माझेच पिल्लू होते या सर्व पिल्लांना मीच मोठं केलेला आहे. मात्र बाप बदलल्यामुळे कदाचित त्यांच्यावर माझे संस्कार कमी पडल्याचे म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.

दरम्यान, श्री खडसे यांना गौण खनिज प्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून एअर अॅम्बुलन्सने मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. असा कोणता ह्यदयविकाराचा झटका त्यांना आला ? खोटी सोंगं करायची. उपचार घ्यायचे आणि परत इकडे येऊन आरोप करायचे. याला काय म्हणावे ? त्यापेक्षा खडसे यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी सरकारच्या योजनांच्या जागर रथाला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी लगावला.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result