गिरीश महाजन यांच्या शिवसेनेवरील टीकेवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse)यांनी गिरीश महाजनासोबत (girish mahajan) शिवसेनेवर (shivsena) निशाणा साधला. महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या गिरीश महाजन (girish mahajan) यांना शिवसेना का उत्तर देत नाही? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
शिवसेना म्हणजे गटारीतील बेडूक असल्याची टीका गिरीश महाजन करतात. याचे उत्तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी द्यावे की शिवसेना बेडूक आहे की हत्ती? असा प्रश्न करत खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हे शिवसेनेला हिणवतात, बेडूक म्हणतात. त्यानंतर शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसोबत चहा घेतात, जेवण करतात. जिल्ह्यात शिवसेना-भाजपची छुपी युती आहे. गिरीश महाजनच्या टीकेबाबत उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी द्यावे.
काय म्हणाले होते गिरीश महाजन
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बीकेसीमध्ये सभा पार पडली. त्यावर प्रतिक्रिया देतांना गिरीश महाजन म्हणाले की, 'शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आहे. विधानसभेला युती नसती तर सेनेचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते. शिवसेना म्हणजे 'गटरातील बेंडूक' आहे. शिवसेना सत्ता लंपट आहे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून 4 खासदार निवडून आणावे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस ही आमदार निवडून आले नसते' अशी टीका महाजन यांनी केली.