सचिन बडे | Edible Oil Price Reduce : वाढत्या महागाईमुळे (Inflation) महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. पण, आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. कारण खाद्यतेलाच्या (Edible Oil) दरामध्ये प्रती लिटर 15 रुपयांनी कपात केली आहे. खाद्यतेल स्वस्त झाल्यामुळे गृहिणींना आणि हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खाद्य तेलावरील आयात शुल्क हटवल्याने खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. यामुळे मलेशिया आणि इंडोनेशियातून तेलाची आवक वाढली असून यात पाम तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे.
पामतेल पंधरा रुपयाने स्वस्त झाले आहे. यानुसार पामतेलाची किंमत 170 रुपयांवरून 155 रुपये झाली आहे. तर, सोयाबीन तेल 170 ऐवजी 158 रुपये लिटर झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वर्षभरापासून वाढतच आहेत. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारत दरवर्षी सुमारे 13 कोटी टन खाद्यतेल आयात करतो. खाद्यतेलासाठी देशाचे आयात अवलंबत्व ६० टक्के आहे.