हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी. कोल्हापूर आणि पुण्यात 2 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. जवळपास 20 अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल. साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीने पहिली कारवाई केली आहे.
माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घराला परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.सोमय्या यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट दिली होती. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते.
या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली. बंगल्याच्या चारी बाजूने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.