शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहेत. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात राऊत यांची चौकशी सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
यासोबतच ते म्हणाले की, एक दिवस उद्धव ठाकरेच यांना बाहेरचा रस्ता दाखवतील तेव्हा यांना यांची जागा कळेल. शरद पवारांच्या नादी लागून यांनीच वाटोळं केलं आहे. त्यांनी प्रत्येक वेळी यांनीच अनेक कारणं दाखवून आपण राष्ट्रवादीसोबत कसं असायला पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचंच हे कारण हे. सर्वजण फुटले त्याचं कारणचं संजय राऊत. “त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. बाळासाहेबांची शपथ घेण्याइतके ते मोठे नाहीत. तो अधिकार आम्हाला आहे. आम्ही शिवसेनेत ४० वर्षे काढली. नोकरी करता करता नेते होण्याइतकं सोपं नाही. त्याची जाणीव आता त्यांना होऊन जाईल. असे ते म्हणाले.