ताज्या बातम्या

शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदल यांची तब्बल 85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केल्याचे पाहायला मिळत आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने 21 ऑगस्ट रोजी छापे टाकले होते.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची 85 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यानंतर बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेली मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली असून बांदल यांच्या निवासस्थानातून काही कागदपत्रे देखील जप्त केली आहेत.

त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली असून बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

BJP Vidhan Sabha Election Updates : भाजप सुमारे 153 जागांवर लढण्याची शक्यता

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क

Radhakrishna Vikhepatil Meet Manoj Jarange Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Radhika Apte Pregnancy : राधिका आप्टे होणार आई! एका फेस्टिव्हल दरम्यान फ्लॉन्ट केला बेबी बंप...

Vijay Wadettiwar : 'या' दिवशी येणार काँग्रेसची पहिली यादी विजय वडेट्टीवार म्हणाले...