केंद्र सरकार विरोधात वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’ यात्रा सुरु झाली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही भारत जोडो यात्रा पार पडणार आहे. आज या यात्रेचा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसाच्या यात्रेतील एक गोष्ट प्रचंड चर्चेत येत आहे. राहुल गांधी यांना चक्क एका माहिलेनी लग्नाचा प्रस्ताव टाकला आहे.
खासदार जयराम रमेश यांनी या भेटीशी संबंधित एक रंजक गोष्ट ट्विटद्वारे सांगितली आहे. माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट म्हटले आहे की, राहुल गांधी आज (ता. ११ सप्टेंबर) दुपारी मार्तंडममधील महिला मनरेगा कामगारांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका महिलेने सांगितले की, मला माहित आहे की राहुल गांधींचे तामिळनाडूवर प्रेम आहे आणि त्यांचे लग्न एका तामिळ मुलीशी करू इच्छिते.’ असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी-वड्रा यांनी देखील यात्रेचे फोटो शेअर केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, देशातील जनतेचा संदेश स्पष्ट आहे, महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकट आणि फुटीरतावादी राजकारण संपले पाहिजे. यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने उत्साहित झालेल्या काँग्रेस पक्षाने ट्विटरवर लिहिले की, “हात भेटत आहेत, हृदये जोडत आहेत. भारत जोडो यात्रा भारताला एकत्र आणत आहे.’