ताज्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांना फटका; चक्क रुळांवरून चालत जाण्याची आली वेळ

Published by : shweta walge

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांना फटका बसला आहे. 10 ते 12 आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूरवरून मुंबईला येणारी सिध्देश्वर एक्सप्रेस गाडी कुर्ला येथे अडकली आहे. विदर्भ, अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली असून अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील रेल्वेरुळावरून चालत बाहेर निघाले आहेत. अमरावती,बुलढाणा, यवतमाळ, जळगाव अकोला जिल्ह्यातील प्रमुख आमदारही अडकल्या माहिती समोर आली आहे.

मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावरदेखिल परिणाम होण्याची शक्यता. आज सकाळी ११ वाजता विधानसभा कामकाज सुरु होणार आहे. परंतु अतिवृष्टीमुळे आमदार व मंत्री पोहचले नसल्यास कामकाज काही वेळेसाठी स्थगित करणार असल्याचही सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याच सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कोकणात

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून आज बीडसह, धाराशिव बंदची हाक

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली