मुंबई विमानतळावरुन तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने ही मोठी कारवाई केली आहे. तब्बल 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ड्रग्जसह एकाला अटक केली गेली आहे. 16 किलो हेरॉईन देखिल सापडलंय आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत तपास करण्यात आला. या तपासामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते.ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते. पण कुणालाही कळू नये यासाठी या बॅगमध्ये खास व्यवस्था करण्यात आलेली होती.
या ड्रग्जचं वजन केलं असता त्याचं मूल्य 16 किलो असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर या ड्रग्जची किंमत 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचीही माहिती डीआरआयने दिली आहे