ताज्या बातम्या

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी 20 नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या कारवाईत ड्रग्स विक्रेते नायजेरीयन नागरिकांना स्थानिक व्यक्तीने आपल्या घरात भाड्याने ठेवले होते. त्या घरात ड्रग्स आणि दारूची पार्टी सुरू असताना पोलिसांनी रात्री छापा टाकला आणि त्या नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतलं.

यामध्ये 27 लाख रुपयांचे मिफेड्रॉन ड्रग्स आणि दारूचा साठा सापडला असल्याची माहिती मिळत आहे. घर भाड्याने देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

'महाराष्ट्रात इंडिया आघाडीचं सरकार बहुमताने येईल' काँग्रेसचे नेते सचिन पायलट

मनोज जरांगे मराठा, दलित, मुस्लीम मतांचं समीकरण जुळवणार?

Rohit Patil Exclusive UNCUT | आबांवरील टीकेनंतर रोहित पाटील आक्रमक, थेट दादांवर पलटवार | Lokshahi

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 3 ब्रिटिशकालीन बॉम्ब; परिसरात खळबळ

Manoj Jarange | जरांगे मराठा, दलित, मुस्लीम मतांचं समीकरण जुळवणार ? | Marathi News