पुण्यात एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हॉटेलमधील वॉशरुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुचनेनंतर कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनिल माने यांचे निलंबन करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.