भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे पुण्यातील अपघात प्रकरणातील घटनेची चौकशी करणार आहेत. हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत? सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे दिले. मुळात डॉ. सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी, यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता.
यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेत घोषणाही केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतू वर शंका आणणारे आहे? ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी. असे अंबादान दानवे म्हणाले.