donald trump wins 
ताज्या बातम्या

Donald Trump Wins: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही लढत अत्यंत चुरशीची झाली.

Published by : Team Lokshahi

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही लढत अत्यंत चुरशीची झाली.

अमेरिकन निवडणुकीमध्ये अध्यक्षीय मतदारांची संख्या ही 538 आहे. विजयासाठी उमेदवाराला 270 चे मॅजिक फिगर गाठावे लागते. रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना 277 अध्यक्षीय मते मिळाली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार, माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना 226 मतांवर समाधान मानवे लागले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प हेडक्वार्टर्स येथे अध्यक्षीय भाषण करून अमेरिकन जनतेचे तसेच आपल्या संपूर्ण टीम आणि कुटुंबियांचे आभार मानले. ट्रम्प यांनी जे.डी वॅन्स यांची उपराष्ट्राध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अवघ्या एक आठवड्यापूर्वी दोन्ही उमेदवारांनी देशाला चालविण्यासंबंधीची विविध धोरणे मांडली आहेत. निवडणुकीच्या मैदानात डोनाल्ड ट्रम्प यांची लढत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याबरोबर होती. दोन्ही उमेदवारांनी जनतेला आकर्षित करण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. ट्रम्प यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला त्यातून ट्रम्प यांना सहानुभूती मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेत होणाऱ्या या अध्यक्षीय निवडणुकीची भारतातही जोरदार चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले होते. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री अनेक प्रसंगी जगजाहीर झाली आहे. भारतीयांकडून ट्रम्प यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कशी होते राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक?

अध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असली तरी ती निवडणूक अध्यक्षाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची निवडणूक आहे. अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करणारा एक विशिष्ट मतदार वर्ग असतो. त्यालाच निर्वाचकगण- इलेक्टोरल कॉलेज म्हटले जाते. अर्थातच सामान्य मतदार अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सरळ मतदान करीत नाही. तो अध्यक्षाची नाही, तर अध्यक्षीय मतदारांची निवड करतो. तेथील अध्यक्षीय मतदारांची संख्या राज्यनिहाय निराळी आहे. अमेरिकेतील एकूण 50 राज्यातील अध्यक्षीय मतदारांची संख्या 535 आहे. परंतु अध्यक्षीय मतदारांची – निर्वाचकगणाची एकूण संख्या 538 आहे. त्यासाठी 23 वी घटनादुरुस्ती महत्त्वाची ठरली आहे. या दुरुस्तीला अनुसरून राष्ट्रीय राजधानी असलेल्या वाशिंग्टन, डी. सी. (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) साठी तीन अध्यक्षीय मतदार देण्यात आले आहेत. अर्थातच ही संख्या लहान राज्याच्या अध्यक्षीय मतदाराइतकी आहे. लहान राज्याची लोकसंख्या कितीही असली तरी त्यांची अध्यक्षीय मतदारांची संख्या तीन असते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी