डोलो-650 (Dolo-650)औषध सामान्यतः तापावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. प्रत्येक घरात हे औषध उपलब्ध आहेत. या औषधाची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्सने (Micro Labs)कोरोनाच्या काळात भरपूर नफा कमावला. कंपनीने औषध लिहिण्याच्या बदल्यात डॉक्टरांना 1000 कोटींची गिफ्ट वाटल्याचे समोर आले आहे.
बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 6 जुलै रोजी आयकर पथकाने नऊ राज्यांमध्ये मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या 36 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई केल्यानंतर 1.20 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 1.40 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

वेदनाशामक औषध
CBDTने कंपनीची ओळख उघड केली नाही. मात्र, सूत्रांच्या अहवालाने पुष्टी केली आहे की ती कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेड आहे. CBDTला तपासादरम्यान आणखी अनेक आर्थिक अनियमितता आढळून आल्या आहेत. कोरोनाच्या काळात, हे वेदनशामक (वेदना कमी करणारे) आणि अँटीपायरेटिक (ताप कमी करणारे) औषध डोलो-650 उपचारांमध्ये डॉक्टरांनी सर्वात प्रभावी म्हणून वापरले होते.