ताज्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

Published by : shweta walge

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीसने आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळण्यास सांगितलं आहे. ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता दर्शवली आहे. शनिवारपासून समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना समुद्राजवळ जाण्यास टाळाण्याल सांगितले आहे.

किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होऊ शकते . त्यामुळे नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेच्या सर्व सहायक आयुक्त यांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनीही योग्य ती खबरदारी बाळगावी.किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवाव्यात , जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही. तसेच समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा