SP Team Lokshahi
ताज्या बातम्या

शिवसेनेनंतर आता 'सपा'मध्येही फूट; काका शिवपाल यादवांना अखिलेश यांनी स्वष्ट सांगितलं, की..

शिवपाल सिंह यादव यांनी 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रगतीशील समाजवादी पक्ष सपामध्ये विसर्जित केला होता, मात्र त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यात काडीमोड झाला आहे.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : शिवपाल यादव आणि ओमप्रकाश राजभर यांना समाजवादी पक्ष कार्यालयाच्या वतीने पत्र लिहण्यात आलं आहे. "जर तुम्हाला दुसरीकडे कुठे जास्त मान मिळेल असं वाटत असेल तर तुम्ही तिथे जाण्यास स्वतंत्र आहात." असं सपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेनेप्रमाणे आता उत्तर प्रदेशमध्ये समाजादी पक्षात फूट पडण्याचं पाहायला मिळतंय. सुहेलदेव समाज विकास पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांना सपाने म्हटलंय, तुमची भाजपशी चांगली जवळीक आहे. तुम्ही भाजपला मजबूत करण्यासाठी सतत काम करत आहात. जर तुम्हाला तिकडे जास्त आदर मिळत असेल, तर तिकडे जा असं सांगण्यात आलं आहे.

सुभासपाचे आमदार ओमप्रकाश राजभर आणि सपा आमदार शिवपाल सिंह यादव यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. या पत्राची प्रत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस आणि खासदार प्रोफेसर राम गोपाल यादव आणि समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांनाही पाठवण्यात आली आहे. ओमप्रकाश राजभर हे यूपीच्या जहूराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि सुहेलदेव हे भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर अखिलेश यादव यांचे काका शिवपाल सिंह यादव यांनी 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रगतीशील समाजवादी पक्ष सपामध्ये विसर्जित केला होता.

अखिलेश यादव यांच्यासोबतचे मतभेद संपल्यानंतर त्यांनी जसवंतनगरमधून सपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. सपाला निवडणुकीत 111 जागा मिळाल्या असून, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या तब्बल दुप्पट आहेत. मात्र ते भाजपला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखू शकले नाहीत. सपाच्या पत्रानंतर ओमप्रकाश राजभर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजभर म्हणाले, '24 तासांत सर्व काही स्पष्ट होईल. अखिलेश यादव यांच्या या निर्णयाचं स्वागत आहे. त्यांनी आमचं ऐकलं नाही आणि हरले. आम्ही कोणाचे गुलाम नाही. त्यांचं नवरत्न त्यांचं बूथ जिंकू शकत नाहीत. आम्ही लवकरच नवीन रणनीती जाहीर करू.'

राजभर यांच्या पक्षाने नुकतेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांकडे सपा लक्ष देत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही बाजूंकडून सतत आरोप प्रत्यारोप सुरू होते. माजी मंत्री राजभर यांचं म्हणणं आहे की, सपा आघाडीने त्यांच्या पक्षाला विरोधकांच्या महत्त्वाच्या बैठकांना आमंत्रित केलं नव्हतं. तसंच महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचं मत घेण्यात आलं नाही.

Latest Marathi News Updates live: बाबाजी काळेंनी केला दिलीप मोहितेंवर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर

बॅग चेकिंगवरून प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले...

Ajit Pawar : विधानसभेला गंमत करून नका, नाहीतर बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही

Yashomati Thakur : महाविकास आघाडीचे जर सरकार आलं तर सोयाबीनची 7 हजार रुपयांनी विक्री होणार