चंद्रशेखर भांगे, पुणे
पुणे ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पोलीस खात्यातून बडतर्फ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा पोलीस दलात रुजू झाल्याची माहिती मिळत आहे. एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघा जणांना पुन्हा पोलीस दलात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील ससून हॉस्पिटल मधून ड्रग्सची तस्करी करणाऱ्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार राजेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं.
मात्र आता या बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा गृह विभागाने पोलीस दलामध्ये समाविष्ट करून घेतला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रग्सची तस्करी करत होता.
या प्रकरणात ड्रग्ज ललित पाटील याच्यासोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. आता पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत त्यांना समाविष्ट करून घेतलं आहे.