Dinvishesh Team Lokshahi
ताज्या बातम्या

आज काय घडले : गोवा मुक्ती संग्रामास सुरुवात

सरसंघचालक सुदर्शन यांचा जन्म, झाशींची राणी यांचे निधन

Published by : Team Lokshahi

गोवा मुक्ती लढ्याचे प्रमुख डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्यातील मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.

सुविचार

"झेप" घेण्याची वृत्ती अंगीच असेल तर "वयाचं बंधन" मध्ये येत नाही.

आज काय घडले

  • १९४६ मध्ये गोवा मुक्ती लढ्याचे प्रमुख डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्यातील मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. त्यांचा हा लढा असाच सुरु राहिला कालांतराने सन १९६१ साली गोवा स्वातंत्र्य झाले.

  • १९५६ मध्ये र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले. केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय होते.

  • १९८१ मध्ये जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळ्या-खुरकत या रोगावरील पहिली जनुकीय लास विकसित करण्यात आली.

आज यांचा जन्म

  • भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि भारतातील समाज सुधारणावादी चळवळीचे नेते तसेच महात्मा गांधी यांचे अनुयायी दादा धर्माधिकारी यांचा १८९९ मध्ये जन्म झाला. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग होतला होता.

  • पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा १९११ मध्ये जन्म झाला. त्या पहिल्या विद्यावाचस्पती होत्या.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा १९३१ मध्ये जन्म झाला. २००० ते २००९ या कालावधीत ते सरसंघचालक होते.

आज यांची पुण्यतिथी

  • झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत १८५८ मध्ये मृत्यू झाला.

  • भारतीय स्वातंत्र सेनानी व हिंदी साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे १९७४ मध्ये निधन झाले. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले गेले आहे.

  • हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे २००३ मध्ये निधन झाले. त्यांनी १९३० ते १९९७ दरम्यान हजारापेक्षा जास्त चित्रपटात काम केले.

  • मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचे २००९ मध्ये निधन झाले.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण