आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या देशामध्ये सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य घटनेनं आपल्याला जो सामान्य माणसाला अधिकार दिलेला आहे. तो मतदानाचा अधिकार. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे.
आपल्या आवडीचे आणि देशाचं हित करणारे सरकार हे देशामध्ये किंवा राज्यामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे. याच्यासाठी मी आवाहान करतो की, सर्व नागरिकांनी भरभरुन मतदान करावं. असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.