police constable recruitment 2022  team lokshahi
ताज्या बातम्या

police constable recruitment 2022 : गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात 7231 पदांची पोलीस भरती करण्याचे आदेश

मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार

Published by : Shubham Tate

police constable recruitment 2022 : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे, महाराष्ट्रात 7231 पदांची पोलीस भरती (Police recruitment) करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने सन 2022 ची पोलिस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी व्टिट करून दिली आहे. (dilip walse patil announced 7231 police constable recruitment)

राज्यात सत्तासंघर्षाचं सावट असताना ठाकरे सरकारनं जनहिताची कामं सुरुचं ठेवली असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने दोन टप्प्यामध्ये पोलिस भरती करायचं ठरवलं होतं. पहिली टप्प्यातील ५ हजार पोलिसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्यासंदर्भात नियमामध्ये बदल करणं गरजेचं होतं. राज्याच्या पोलीस महासंचालकांना पोलीस भरती (Police recruitment) त्वरीत सुरु करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. या भरतीसाठी सुरवातीला परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये आधी शारीरिक चाचणी आणि त्यांनतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. तसंच पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...