ताज्या बातम्या

धुळ्यात मुसळधार पाऊस; शेतीचे प्रचंड नुकसान

Published by : Siddhi Naringrekar

विशाल मोरे, धुळे

परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी हवालदार झाला आहे.

मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून धुळे तालुक्यातील देवभाने, कापडणे, धमाने यासह इतर गावांना या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

काढणीला आलेला गहू, कापूस, हरभरा, मका इत्यादी पिके पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच कापडणे परिसरात असलेल्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्याला करावी अशीच मागणी आता शेतकरी करत आहे.

Rohit Pawar : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Supriya Sule : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर; सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या...

Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला; भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला

राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 1 ऑक्टोबरला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरुच; मुंबई, ठाण्यात पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट