Wardha Team Lokshahi
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत १०० टक्के द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

शेतकऱ्यांच्या व झोपडपट्टी धारकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन.शेताच्या नुकसानीचे टक्केवारी कमी दाखवल्यामुळे मिळाली तोकडी मदत.

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा: सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलेले मदत सरसकट न मिळाल्यामुळे फेरसर्वे करून मदत देण्याबाबत तसेच झोपडपट्टी अतिक्रमण धारकांना शासकीय झोपडपट्टी पुनर्वसन कायदा अंतर्गत महसूल विभागाने स्थायी पट्टे देण्यात यावे या मागणी करता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी व झोपडपट्टी अतिक्रमण धारकांचच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा अतिवृष्टीमुळे पिके निस्तेनाभूत झाल्यामुळे आणेवारी ० टक्के असल्यामुळे पन्नास टक्क्यांच्या आत आणेवारी जाहीर करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा असे सुद्धा नमूद करण्यात आले.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत महसूल विभागामार्फत बँकेत जमा झाली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत जमिनीचे पंचनामे करताना कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी यांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या नुकसानीचे टक्केवारी कमी दाखवल्यामुळे रक्कम पूर्ण जमा झाली नाही. ०३ हेक्टर पर्यंत सरकारने जाहीर केलेली मदत अत्यल्प मिळाल्याने शासनाने शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसले आहे.

जुलै ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उध्वस्त झाली, जळाली रखडून गेली, गाळ साचला इत्यादी नैसर्गिक कारणासाठी सरकारने साडेसात एकर, ८ एकर, १० एकर बारा एकर १५ एकर २० एकर २५ एकर २९ एकर जमिनीसाठी सरकारने सरसकट तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली. परंतु महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने १ हेक्टर, २ हेक्टर अशी अतिवृष्टीचे क्षेत्र दाखवल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३ हजार रुपये, ८ हजार १६९ रुपये, २० हजार रुपये अशी तुकडी रक्कम जमा झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे साडेसात एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत म्हणजे ४१ हजार ४०० रुपये मिळाले नाही.

त्याला सर्वस्वी जबाबदार महसूल विभागातील एसडीओ, तहसीलदार, नायब तहसीलदार, पटवारी इत्यादी अधिकारी जबाबदार आहे. अतिवृष्टीच्या काळात प्रशासकीय अधिकारी हेडकॉटर वर राहत नाही. घरी बसून अतिवृष्टीचे क्षेत्राचे मोजमाप पूर्णपणे पाठवले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेली सरसकट तीन हेक्टर पर्यंतचे आर्थिक मदत मिळू शकली नाही याला सर्वस्वी महसूल विभाग जबाबदार आहे त्याची सरकारने त्वरित दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे.

ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन सवंगणे कठीण झाले आहे परतिच्या पावसामुळे सोयाबीनच्या दाण्याला कोंबे फुटली असून पिकाचे ढीग सडले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असल्यामुळे ढिगाला बुरशी लागली असून सोयाबीनचे ढीग सडले असून दुर्गंध सुटला आहे कपाशीचे पीक जेमतेम निंदन डवरन, फवारणी व सल्फेट देवून बहरत आहे. सततच्या पावसामुळे फुले फळे बुरशीजन्य रोगामुळे किडीच्या प्रादुर्भावामुळे गळून पडले आहे. कर्जाने उभी केलेली शेती अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त होऊन शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे अशाप्रकारे शेतकऱ्याचे जनजीवन विकळीत झालेले प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिसत असताना सुद्धा शेतकरी बापाला आत्महत्येकडे प्रवृत्त करण्याचा प्रकार सुरू आहे.

तरी सरकारने फेरस सर्वे करून शेतकऱ्यांना सरसकट तीन हेक्टर पर्यंत मदत द्यावी तसेच झोपडपट्टी अतिक्रमण धारकांना शासकीय झोपडपट्टी पुनर्वसन कायदा अंतर्गत स्थायी पट्टे देण्यात यावे या सर्व मागण्यांकरिता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात तसेच शेतकरी व झोपडपट्टी अतिक्रमणधारक यांच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माजी उपसभापती समुद्रपूर पांडुरंग किटे,संतोषराव तिमांडे,अतुल वांदिले,डॉ.उमेश वावरे, महादेवराव ठक, श्याम ईडपवार, सुरेश डांगरी,रवींद्र डवरे, चोखाराम डफ, स्वप्निल चोरडिया, माजी पं.स समुद्रपूर दमडूजी मडावी, अशोक सुपारी,सरपंच नामदेव राऊत,अमोल राऊत, बोला निखाडेवसंत कारवटकर, अशोकराव शेटे,माणिकराव कलोडे,सचिन पारसडे, बालू महाजन, बाळा दौलत्कर, नाजिर अली,संदीप डगवार,शकील अहमद,विलास बोभाटे,उत्तमराव बोभाटे,भाऊराव देवडे, संदेश ससाने,सरपंच निंभा ईश्वर सुपारी, संजय ढोकपांडे, मोतीबाबा झाडे, सरपंच बुरकोणी विजय बोरकर, ऋषी फुल, गणपत भोंग,प्रशांत पवार, बाबाराव मोघे,दिवाकर डफ,परसराम घवघवे, कवडू पडवे,अरविंद डंभारे, मारुती हुलके, प्रदीप बोडकर, सिद्धार्थ म्हैसकर, गुणवंत कांमडी, सतीश सायंकाळ, आकाश कांबळे,अमोल त्रिपाठी, युवराज माउसकर, राहुल कोळसे,नयन निखाडे,हर्षल बुरीले,हर्षल तपासे,प्रवीण जनबंधु,पवन काकडे,तेजस बुरीले इत्यादी मोठ्या संख्येने शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...