विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आदिवासी आमदारांनंतर आता धनगर आंदोलकांनी मंत्रालयीतील संरक्षक जाळ्यावर उड्या मारल्या आहेत.यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आरक्षण किंवा मागणीसाठी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारणं हे नित्याचं ठरलंय.
आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत आहे. याच मुद्द्यावरून धनगर समाज आज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते आज मंत्रालयात आले होते. मात्र यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या.