राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा बीडमध्ये होत आहे. या सभेत कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी देखील भाष्य केलं आहे.
ते म्हणाले की, 'मला अनेकांनी विचारले की, 27 तारखेची सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर आहे का? मी नम्रपणे सांगितले की ही उत्तर सभा नाही तर ही सभा उत्तरदायित्वाची सभा आहे”, असं ते म्हणाले.
शरद पवार यांनी माझा इतिहास काढला तर लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे हा माझा इतिहास आहे. माझी कर्तबगारी पवारांच्या पुस्तकात, हाच माझा इतिहास आहे. विधानपरिषदेतील माझ्या कामगिरीचं पवारांच्या पुस्तकात कौतुक केलं आहे असं धनजंय मुंडे म्हणाले.
जिल्ह्याने साहेबांना भरपूर प्रेम दिले पण जिल्ह्यातील जनतेला शरद पवार साहेबांनी काय दिलं अशी मिश्किल टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड शहरात आगमन झाले. त्यांचे बीडकरांनी जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले आहे. चौकाचौकात त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. अजित पवारांसोबत असलेले अन्य आठ मंत्री देखील या रॅलीत सहभागी झालेले आहेत.