मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजून एक दसरा मेळावा तो म्हणजे भगवान गडावरचा दसरा मेळावा याचा वाद आता निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं करुणा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. एका माध्यमाशी बोलताना आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार आहे असे त्यांनी सांगितेल.
करुणा मुंडे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मीदेखील स्पर्धेत आहे. मी भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ इच्छित आहे. मी गेल्या २६ वर्षांपासून वंजारी समाजाची, मुंडे घराण्याची सून आहे. मीदेखील या स्पर्धेत असून, दसरा मेळाव्याला भगवान गडावर माझं स्वागत करावं अशी महाराष्ट्राला विनंती आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे, माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडेचा त्या दिवशी वाढदिवस आहे. त्यामुळे तिथे दसरा मेळावा घेणारच,” असे त्यांनी सांगितले आहे
आता गोपीनाथ मुंडे येथे ३५ वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. त्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. आता करुणा मुंडेंच्या या निर्णयावरुन वाद होण्याची शक्यता आहे.