Dhananjay Munde Team Lokshahi
ताज्या बातम्या

धनंजय मुंडे जनता दरबारात मग्न, लाईट गेली तर मोबाईलच्या उजेडात जनसेवेत मग्न

धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारातून अनेकांची कामे जागच्या जागी मार्गी लागतात

Published by : Vikrant Shinde

बीड : देशात सध्या कोळशाच्या टंचाईमुळे अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंगचा (Load Shedding) त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. महाराष्ट्रात मात्र परिस्थिती सामान्य आहे, मात्र अतिरिक्त लोड किंवा इतर कारणांनी अचानक लाईट जाणे किंवा बिघाड होणे याला मात्र पर्याय उरत नाही, त्यातच अचानक लाईट गेल्यानंतर हातातले काम सुरू ठेवण्यासाठी मोबाईल फ्लॅशच्या उजेडाचा वापर करून आजकाल चालू काम पूर्ण केले जाते. याच पद्धतीने जनता दरबारात असताना अचानक लाईट गेल्याने जनतेची निवेदने सोडविण्यात मग्न असलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोबाईल फ्लॅशच्या उजेडात आपले काम सुरू ठेवल्याचे पाहायला मिळाले.

सोमवारी बीड शहरात असताना धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी भवन (NCP Bhavan) येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली. शक्य तेवढ्या जास्तीत जास्त निवेदनावर जागच्या जागीच संबंधितांना फोन करून, पत्र देऊन किंवा सूचना करून ते निवेदन निकाली काढण्याचा मुंडेंचा शिरस्ता आहे.

या जनता दरबारात देखील त्याचप्रमाणे निवेदनांवर कारवाया करणे सुरू असताना अचानक लाईट गेली, तर चक्क मोबाईल फ्लॅशच्या उजेडात धनंजय मुंडे यांचे कामकाज सुरू असल्याचे पाहायला मिळाले. पुढील काही मिनिटात लाईट आली मात्र जनता दरबार मात्र विना व्यत्यय पार पडला.

बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकत्रित जबाबदारी पार पाडत असलेले धनंजय मुंडे हे मुंबई व्यतिरिक्त परळी, अंबाजोगाई, बीड, परभणी असे विविध ठिकाणी सातत्याने जनता दरबार उपक्रमांतर्गत जनतेच्या समस्या जाणून घेत असतात. या उपक्रमातून प्राप्त झालेल्या प्रत्येक निवेदनावर समाधानकारक कारवाई व्हावी, असा मुंडेंचा हमखास प्रयत्न असतो, त्यामुळे त्यांच्या जनता दरबारास मोठी गर्दी देखील पाहायला मिळते.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...