Devendra Fadnavis Tweet : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई विभागात अतिमुसळधार पाऊस पडल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती. पुण्याचं खडकवासला धरण तुडुंब भरल्यानं नदी-नाल्यांना पूर आला होता. कोल्हापुरातील पंचगंगा नदी पातळी 47 फूट 6 इंच झाली असल्याची माहिती फडणवीसांनी ट्वीटरवर दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर काय म्हणाले?
नदी पातळी आणि विसर्गाची स्थिती अशी.
सिंचन विभाग सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहे.
(दि. 27 जुलै 2024/सायं. 5 वाजता)
1) खडकवासल्यात 82.58 टक्के पााणीसाठा आहे. कालव्यातून विसर्ग 1005 क्युसेक इतका होत आहे.
2) कोयनेत धरण पाणीसाठा 78.28 टक्के इतका आहे. नदी विसर्ग 32,100 क्युसेक इतका होतो आहे.
3) सांगलीतील आर्यविन पूल येथील पाणीपातळी 40 फूट 5 इंच इतकी असून, अलमट्टी धरण पाणी पातळी 516.20 मीटर इतकी आहे.
4) कोल्हापुरातील पंचगंगा नदी पातळी 47 फूट 6 इंच इतकी आहे. राधानगरी धरण विसर्ग 7121 क्युसेक इतका आहे.