भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा फडकत राहील अशी प्रार्थना केली आहे. सोबतच अनेक मुद्द्यावर भाष्य देखील केलं आहे.
ते म्हणाले की, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी दिल्लीमध्ये 500 विशेष पाहुणे बोलवले आहेत. ज्यामध्ये शेतकरी आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोक आहेत, सामान्य कार्यकर्ते, सफाई कर्मचारी आहेत. बांधकाम कामगार आहेत देशाच्या स्वातंत्र्याचा महत्त्व आणि तो साजरा करताना समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम माननीय प्रधानमंत्री यांनी केला आहे.
हर घर तिरंगा हे देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासोबत मेरी माटी मेरा देश या अभियानाच्या अंतर्गत आपल्या देशाप्रती आपल्या मातीप्रती एक सन्मानाची अभिमानाची भावना आपल्या मनात तयार होत आहे. विश्वास आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आपला प्रदेश हे दोन्ही शेवटच्या माणसाची स्वप्न पूर्ण करत विकासाकडे जातील.
एका गोष्टीचा समाधान आहे की गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी जे शौर्य दाखवले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदक मिळालेत. 26 जानेवारीला पण मिळाली होती. या वर्षांमध्ये 64 पदक जी देशात कदाचित सर्वाधिक असलेला आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना मिळाले आहेत. त्यांच्या शौर्या करता त्यांना शुभेच्छा देतो.
अजूनही संघर्ष संपलेला नाही, भटकलेल्या एकही व्यक्ती बाहेर गेला असेल तर त्याला मुख्य धारेमध्ये आणावे लागेल देश विघातक शक्ती देखील आता माओवाद्यांसोबत आहेत, तेव्हा निश्चित गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस सजग आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील संपर्क तुटणारे गाव आहे त्यांचा संपर्क 24 बाय 7 करून त्यातलाच आज पहिल्या पुलाच उद्घाटन आम्ही या ठिकाणी करत आहोत. की ज्यामुळे पावसाळ्यात अनेक गावाचा जो संपर्क तुटायचा तो आता तुटणार नाही.
गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल ती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे अनेकांशी आमची चर्चा चाललेली आहे मला विश्वास आहे की देशातील नेक्स्ट डेस्टिनेशन आम्ही गडचिरोलीला बनवू. नक्षलवाद्यांना भरती करता लोक मिळत नाही आपल्या राज्यामध्ये आता नक्षलवादांना कोणाचही समर्थन मिळत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10व्यां दा लाल किल्ल्यावरुन ध्वाजारोहण केलं. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरुन महिला शक्तीचा जागर करत अनेक नवीन योजनांची घोषणा केली आहे.