मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओमुळे अवघ्या देशभर खळबळ उडाली. याचे पडसाद मंगळवारी राज्यभर उमटले. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो विषय अनिल परब आणि अंबादास दानवेंनी मांडला आहे. हा विषय नक्कीच गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी घेतली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कोण महिला आहे तिची ओळख सांगता येत नाही पण या केस पुरत तिची ओळख पोलिसांना सांगितल जाईल. पोलिस कायद्याच्या चौकटीत राहून तिची ओळख देखिल शोधून काढतील. अर्थात अशी ओळख आपण कधीचं जाहीर करत नाही. त्यामुळे आपण कोणतीच काळजी करु नका. अशा प्रकारच कोणतही प्रकरण दाबणे, लपवणे, मागे टाकणे असं काहीही केलं जाणार नाही.
किरीट सोमय्यांनी देखील पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. आपण स्वताही चौकशीची मागणी करताय. याची आतिशय सखोल आणि वरीष्ठ स्तरावरची चौकशी केली जाईल.
दरम्यान, सोमय्यांच्या पत्रात कुठेही म्हंटलेलं नाही की तो व्हिडीओ खोटा आहे त्यांनी म्हंटले आहे की मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलंला नाही. म्हणजे याचा अर्थ तो व्हिडीओ खरा असल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केलंलं आहे, असे अनिल परबांनी म्हंटले आहे. तो व्हिडीओ खरा असेल तर त्या बाजूला कोण होतं. कोणी घेतला हा व्हिडीओ का घेतला? हे सगळं बाहेर आलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.