ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा शिखर: वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासाला मंजुरी

Published by : Siddhi Naringrekar

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 76 हजार 200 कोटींच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा शिखर: वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासाला मंजुरी! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण येथील सर्व हवामान ग्रीनफिल्ड डीप-ड्राफ्ट प्रमुख बंदराच्या विकासाला मंजुरी दिली आहे. मा. मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार !

पूर्ण झाल्यावर हे बंदर जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक असेल. एकूण प्रकल्पाचा खर्च ₹76,220 कोटी. या बंदर विकासामुळे सुमारे 10 लाख नवीन रोजगार संधी निर्माण होणार.

पीएम गति शक्ति अंतर्गत ऐतिहासिक दर्जाचे बंदर पालघरमध्ये निर्माण होत असल्याने आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि लाखो लोकांकरीता रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. असे फडणवीस म्हणाले.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी