लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वज राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झाल्या आहेत. मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्याप्रकारे 10 वर्षामध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला. एका नव्या भारताची निर्मिती ही त्याठिकाणी झाली. तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत. ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे. अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं पाहिजे.
मला विश्वास आहे की, श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्याठिकाणी राहिल. मोदीजींच्या सोबत राहिल. मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. पण माझी मात्र त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. असे राज ठाकरे म्हणाले.