CM Eknath Shinde, Devendra Fadnavis Team Lokshahi
ताज्या बातम्या

CM शिंदे, फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; मराठवाडा, विदर्भाच्या पाणीप्रश्नासाठी वर्ल्ड बँकेशी चर्चा

CM शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज बैठक पार पडली.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज बैठक पार पडली. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अडीच हजार ते तीन हजार कोटी रुपयांचे जवळपास हजार प्रकल्प सुरु करण्यासाठी सुचना देण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यामाध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसंच या बैठकीच्या माध्यमातून, शेतकऱ्यांशी आणि पूर व्यवस्थापनाशी संबंधीत मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई-दिल्ली, मुंबई बँग्लोर कॉरीडोरशी संबंधीत निर्णय रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी सकाळी बैठक झाली असून, त्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये मागच्यावर्षी निर्माण झालेल्या परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड बँकेशी देखील चर्चा झाली असून, पंचगंगेतलं पाणी मराठवाड्यात घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी वर्ल्ड बँकसुद्धा सकारात्मक असल्याचं फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं. तसंच शेतकऱ्यांसाठी अॅग्री बिजनेसचं मॉडेल तयार करुन 19 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल अशा एका प्रोजेक्ट संदर्भात देखील वर्ल्ड बँकेशी चर्चा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. त्यानंतर वैनगंगा आणि नळगंगा या नद्यांचं वाहून जाणारं पाणी टनेल आणि कॅनलच्या माध्यमातून विदर्भात घेऊन जाण्याच्या प्रकल्प, तसंच फास्ट ट्रॅकवर काम सुरु असून, मागील अडीच वर्षांपासून प्रलंबित पडलेली ही सर्व कामं आता वेगाने मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यंनी दिले असल्याचं फडणवीस म्हणाले.

वैतरणा, उल्हास नद्यांचं पाणी समुद्रात जे पाणी वाहून जातं, ते पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवण्याच्या कामाचा आढावा घेतला होता. ते आता टेंडल लेव्हेलवर घेऊन आलो असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. कामं का रखडली होती, हे विचारलं असता, याबद्दल आम्ही काहीही बोलणार नसून, थेट फास्ट ट्रॅक पद्धतीनं काम करण्याचं ठरवलं आहे असं फडणवीस म्हणाले. प्रवाही वळण योजना व उपसा योजना सुरु करण्यासाठी तातडीनं अभ्यास करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत असं मुख्यमंत्री शिंदेनी सांगितलं.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती