ताज्या बातम्या

देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक'

आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' मिळालं आहे. याशिवाय 31 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर

Published by : Sagar Pradhan

प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे आज राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' मिळालं आहे. याशिवाय 31 जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना 'पोलीस पदक' जाहीर झाली आहेत.

राष्ट्रपती पोलीस पदक मिळवलेल्या चार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर 31 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे. तर महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे.

देशभरात 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर

देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक, 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात काम करणाऱ्या 80 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केले जाणार आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती