Dombivali MIDC Blast 
ताज्या बातम्या

डोंबिवली MIDC मध्ये मोठा स्फोट! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटरवर दिली घटनेची माहिती

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis Tweet On Dombivali MIDC Blast : डोंबिवलीतील एमआयडीसीच्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा मोठा स्फोट झाल्याची दुर्देवी घटना घडलीय. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३५ कामगार जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केल्याची माहिती भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी लोकशाहीशी बोलताना दिलीय. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर आहे की, आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिलीय.

देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर काय म्हणाले?

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम